सत्ताधारी महायुतीतील धुसफूस कायम:भाजपच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब; फडणवीसांचा 'देवाभाऊ' असा उल्लेख

सत्ताधारी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या एका बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब झाला आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे. पण अजित पवारांचे नाही. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. राज्यभरात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असताना आता या योजनेचे श्रेय घेण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातून मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट मोहिमेचा शुभारंभ केला. या पार्श्वभूमीवर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लागले आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकही फोटो या बॅनरवर दिसत नाही. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळातही खमंग चर्चा रंगली आहे. या बॅनरवर फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ म्हणून करण्यात आला आहे. 'देवाभाऊ, लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला', असे त्यावर नमूद आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केलेल्या एका व्हिडिओ जाहिरातीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा उल्लेख 'अजितदादांची लाडकी बहीण' योजना असा केला होता. यामुळे अगोदरच महायुतीत वाद पेटला होता. त्यात आता भाजपच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झाल्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. NCP च्या जाहिरातीत 'अजितदादांची लाडकी बहीण' असा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत राष्ट्रवादीने मुख्यमंत्री हा शब्द वगळून दादाचा वादा अशी टॅगलाईन वापरत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. विशेषतः या जाहिरातीत त्यांनी अजित पवारांची लाडकी बहीण असा उल्लेखही केला आहे. या जाहिरातीत महायुतीच्या इतर नेत्यांना स्थान न देता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांचा उल्लेख आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आक्षेप घेतला होता. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी या जाहिरातीमुळे मतदारांत महायुतीसंबंधी गैरसमज निर्माण होण्याची भीती व्यक्त केली होती. अजितदादा गटाच्या या कृतीमुळे महायुतीत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचे आपल्या नेत्यावरील प्रेम समजू शकते. पण एखादी योजना किंवा घोषणेला सर्वांनी साथ दिली पाहिजे. अर्थमंत्री व गृहमंत्री यांचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. या प्रकरणी अजित पवारांचेही श्रेय आहे. पण सोबतच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचेही आहे. राज्य मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर केली. त्यामुळे राष्ट्रवादीने आपापल्या मतदारसंघात या योजनेचा प्रचार करताना अजित पवारांचा फोटो लावावा, पण महायुतीच्या इतर नेत्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे संजय शिरसाट म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळले होते आरोप दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे हे आरोप फेटाळून लावलेत. प्रस्तुत जाहिरातीत आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. केंद्राच्या अनेक योजना पंतप्रधानांच्या नावे असतात. तशा राज्यातील योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने असतात. या जाहिरातीत लाडकी बहीण योजनेचा शॉर्टफॉर्म वापरण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून ही योजना सादर केली, असा युक्तिवाद राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.

Sep 10, 2024 - 22:13
 0  4

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow