आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवशी ३७ टन कचरा केला गोळा

भाईंदर - शनिवार २१ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस च्या अनुषंगाने भाईंदरच्या उत्तन समुद्र किनारी महापालिके सह विविध शाळा , महाविद्यालये , संस्था आदींनी स्वच्छता मोहीम राबवली . यावेळी ३७ टन इतका कचरा किनाऱ्यावरून गोळा केला गेला .
उत्तन आणि वेलकंनी येथील समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली . यावेळी महापालिका आयुक्त संजय काटकर , मिस अर्थ गौरी घोटणकर आणि गायक कुणाल पंडित , अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर, उपायुक्त डॉ. सचिन बांगर व संजय दोंदे सह अनेक अधिकारी आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील ११ सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, १० महाविद्यालय आणि ९ शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक मोहिमेत सहभागी झाले होते . स्वच्छतेची शपथ घेऊन साफसफाईला सुरुवात केली गेली . किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात , प्लास्टिक मी गोण्या , कपडे आदी कचरा साचला होता .
उत्तन समुद्रकिनाऱ्यावर २२.५ टन व वेलंकनी समुद्रकिनाऱ्यावर १५ टन इतका कचरा गोळा केला गेला . तो नंतर घनकचरा प्रकल्पावर पाठवण्यात आला अशी माहिती पालिकेने दिली . तर बंदी असलेल्या प्लास्टिक सह सार्वजनिक ठिकाणी तसेच जल क्षेत्रात कचरा टाकणाऱ्यांवर कठोर अशी दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यास पालिकेने कमालीची टाळाटाळ चालविल्याने शहरात सर्वत्र प्लास्टिक - कचऱ्याचे साम्राज्य पसरले आसल्याचा संताप जागरूक नागरिकांनी बोलून दाखवला .
What's Your Reaction?






