केंद्र व राज्य शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक वस्तूंचा मीरा भाईंदर मध्ये सुळसुळाट

भाईंदर - केंद्र आणि राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीला मीरा भाईंदर महापालिकेसह संबंधित ने मात्र केराची टोपली दाखवली आहे . शहरात सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व वस्तूंची विक्री होत असताना आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त , उपायुक्त व संबंधित अधिकारी - कर्मचारी मात्र पंतप्रधान आणि केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयालाच भीक घालत नसतील तर सामान्यांचे काय ? असा प्रश्न जागरूक नागरिक करत आहेत .
महाराष्ट्रात २०१८ साली भाजपा - सेना युती शासनाने प्लास्टिक पिशव्या , प्लास्टिक ग्लास , प्लेट , चमचे , स्ट्रॉ , थर्माकॉल , प्लास्टिक पार्सल डब्बे आदींवर बंदी घातली . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एकल वापराच्या प्लास्टिक पिशव्या आदी वस्तूंना बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यावर यांनी देखील एकही वापराच्या प्लास्टिक वर बंदीचा निर्णय घेतला . त्यामुळे केंद्रातील सरकारने देखील कान साफ करण्यासाठी वापरली जाणारी प्लास्टिक नळी, फुग्या खालील प्लास्टिक नळी , कँडीची प्लास्टिक दांडी , आईस्क्रीमची प्लास्टिक दांडी, प्लास्टिक झेंडे व चाकू - ट्रे , मिठाई वा अन्य वास्तूच्या पॅकिंग साठी वापरली जाणारी प्लास्टिक फिल्म , ग्रीटिंग कार्ड , सिगारेट पाकीट सह १०० मायक्रॉन जाडी पेक्षा कमीचे प्लास्टिक वा पीव्हीसी बॅनर आदींचा बंदी मध्ये समावेश केला.
मानवी आरोग्याला व भटक्या जनावरांना होणारा धोका आणि पर्यावरणाचा ऱ्हास याचा गंभीर धोका ओळखून सरकारने बंदी घालून देखील मीरा भाईंदर मध्ये मात्र त्या बंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे . सर्वत्र बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व वस्तूची उघडपणे विक्री , वापर सुरु आहे . फेरीवाल्यां पासून दुकानदार , खाद्य पेय पदार्थ विक्रेते , किराणा , हॉटेल आदी बहुतांश ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यां सह बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची उघड उघड विक्री - वापर सुरु आहे .
सरकारच्या प्लास्टिक बंदीचा मीरा भाईंदर मद्ये महापालिकेने पुरता फज्जा करून टाकला असताना येथील भाजपा महायुतीतील आजी माजी लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकारी , कार्यकर्ते देखील प्लास्टिक बद्दल चिडीचूप आहेत .
महापालिकेचे आयुक्तां पासून वरिष्ठ अधिकारी देखील प्लास्टिक बंदीचे उल्लंघन चालले असताना कारवाईची जबाबदारी असणाऱ्या अधिकारी - कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यास कमालीची टाळाटाळ करत आहेत . मध्यंतरी बंदी असलेल्या प्लास्टिक वर कारवाई न करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांना केवळ कागदी समज दिली . परंतु त्यांच्यावर कार्यवाही मात्र केली गेली नाही .
राजेश तलरेजा ( तक्रारदार ) - बंदी असलेल्या प्लास्टिकचा शहरात सर्वत्र उघडपणे वापर , विक्री व पुरवठा सुरु असताना महापालिका स्वतःहून कारवाई करत नाही . मी तक्रारी केल्या असत्या उलट माझेच नाव प्लास्टिक विक्री - वापर करणाऱ्यांना सांगून माझ्या जीवाला धोका निर्माण केला गेला . यावरून पालिका आणि प्लास्टिकवाल्यांचे साटेलोटे स्पष्ट होत असल्यानेच पालिका ठोस आणि कठोर कारवाई करत नाही .
What's Your Reaction?






