मला कोणत्याही क्षणी अटक करतील:देवेंद्र फडणवीस अतिशय खालच्या स्तरावर राजकारण आणत असल्याची अनिल देशमुखांची टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला अडकवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे मला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख यांच्याकडून भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात देशमुख यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस हे मागील चार वर्षे पूर्वीची घटना उकरून काढत असून माझ्याविरुद्ध दिल्लीच्या मदतीने सीबीआयमध्ये गुन्हा दाखल केला आहे. चार वर्षांपूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलिस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, असा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार माझ्यावर रेट टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला आहे. दिल्लीच्या मदतीने ते ईडी आणि सीबीआयला हाताशी धरून महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणत असल्याची टीका देखील अनिल देशमुख यांनी केली आहे. नेमके प्रकरण काय? मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सरकार असताना तसेच अनिल देशमुख गृहमंत्री असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मोक्का अंतर्गत मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला होता, असा आरोप देखील गिरीश महाजन यांनी केला होता. तसेच हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनी माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी अनिल देशमुख यांना जाब देखील विचारला होता. असा दावा देखील गिरीश महाजन यांनी केला आहे. आता या प्रकरणाची नुकतीच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... अजित पवारांची संवेदनशीलता VIDEO:अपघात होताच थांबवला ताफा; ॲम्बुलन्समधील डॉक्टरांना प्राथमिक उपचार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यातच अजित पवार हे शिवाजीनगर परिसरातील संचेती हॉस्पिटलच्या पुलाखालून जात असताना एका दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला. या वेळी पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी तात्काळ ताफा थांबवून अपघात ग्रस्तांना मदत केली. अजित पवार यांच्या ताफ्यातील डॉक्टरांना जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश देखील अजित पवार यांनी दिले. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे पूर्ण बातमी वाचा.... राज्यात कायदा नाचवला जातोय!:नागपूर अपघातावर संजय राऊतांचा संताप; फडणवीस गृहमंत्री पदाच्या लायक नसल्याची टीका नागपूर अपघात प्रकरणी बावनकुळे कुटुंबाचा संबंध नसेल तर लपवाछपवी कशासाठी करत आहात? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. नागपूर अपघातात गाडी कोण चालवत होते? सीसीटीव्ही फुटेज गायब का करण्यात आले? गाडीची नंबर प्लेट का काढण्यात आली? एफआरआयमध्ये गाडी मालकाचे नाव का नाही? असे प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. फडणवीस गृहमंत्री पदावर राहण्यास लायक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. पूर्ण बातमी वाचा... अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी:अमित शहांकडे राज्यातही बिहार पॅटर्न राबवण्याचा आग्रह; विमानतळावर घेतली भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा.... युगेंद्र पवारांची आजपासून स्वाभिमान यात्रा; तर जय पवारांच्या मंडळांना भेटी:आधी बहिण - भाऊ आणि आता भाऊ - भाऊ; बारामती विधानसभेत दोन छोटे पवार मैदानात? आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून आपण लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. त्यातच जय पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील दौरे वाढवले आहेत. विविध गणेश मंडळांच्या आरतीच्या माध्यमातून जय पवार सध्या बारामती मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढत आहेत. त्यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही छोटे पवार लढणार का? अशी चर्चा सध्या मतदार संघात होत आहे. पूर्ण बातमी वाचा...

What's Your Reaction?