पाण्याच्या टाकीत पडून 6 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू:पुणे पोलिसांकडून दोषीवर गुन्हा दाखल

वाघोलीतील कवडे वस्ती परिसरात सहा वर्षाची चिमुरडी खेळत असताना, तोल जाऊन जवळच्या बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेखा मुकेशसिंग चौहान (वय 6) असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी रमेश बालाजी मुंडे (वय 40, रा. कवडे वस्ती, वाघोली ) याच्याविरुद्ध निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुकेशसिंग चौहान (वय 29, रा. खांदवेनगर, वाघोली) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. वाघोलीतील कवडे वस्ती परिसरात मुंडे याची तीन मजली इमारत आहे. इमारतीचे बांधकाम अर्धवट झाले आहे. तेथे असलेल्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही. सुरक्षेच्या दृष्टीने पाण्याच्या टाकीला झाकण बसवणे गरजेचे होते.मुकेशसिंग याची सहा वर्षांची मुलगी रेखा अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीतील टाकीजवळ खेळत गेली. त्यावेळी पाण्याच्या टाकीत ती तोल जाऊन पडल्याची घटना घडली. टाकीतील पाण्यात बुडालेली रेखा घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. तेव्हा ती टाकीत बुडाल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. इमारत मालक रमेश मुंडे याच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर मुंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक एस खटके पुढील तपास करत आहेत.

Sep 10, 2024 - 22:13
Sep 23, 2024 - 15:24
 0  21

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow