माझ्या साक्षी मुळे राम जन्मभूमी खटल्याची दशा आणि दिशा बदलली - रामभद्राचार्य महाराज

Sep 23, 2024 - 15:54
 0  10
माझ्या साक्षी मुळे राम जन्मभूमी खटल्याची दशा आणि दिशा बदलली - रामभद्राचार्य महाराज

मीरारोड  - न्यायालयातील माझ्या साक्षी मुळे श्रीराम जन्मभूमी खटल्याची दशा आणि दिशा बदलली . पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र असून ते शतायुषी होवोत. ते चौथ्यांदा पण प्रधानमंत्री बनणार असा आशीर्वाद व शुभेच्छा त्यांना आहेत . यंदा महाराष्ट्रात विधानसभा निवडुनिकीचा निकाल एनडीएच्या बाजूने लागणार असून पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल असे प्रतिपादन पदमविभूषण तुलसीपीठचे पीठाधीश्वर जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी मीरारोड येथे केले .

मीरारोडच्या पूनम गार्डन भागात खाजगी भूखंडात श्रीगंगोत्री उत्तर भारतीय भवनचे भूमिपूजन मंगळवारी रामभद्राचार्य महाराज यांच्या हस्ते झाले . आमदार गीता जैन ह्या त्यांचा भाऊ सुनील जैन यांच्या खाजगी भूखंडात खाजगी खर्चातून उत्तर भारतीय भवन उभारत आहेत . त्याचे भूमिपूजन वेळी विकासक भरत जैन सह अनेकजण उपस्थित होते . बुधवार पासून मीरारोडच्या श्रीकांत जिचकार चौक , एस के स्टोन जवळच्या मैदानात रामभद्राचार्य महाराज यांच्या रामकथा वर ७ दिवसांच्या कार्यक्रमचे आयोजन आ . जैन यांनी केले असून त्या निमित्ताने ते शहरात आले आहेत .

भूमिपूजन वेळी रामभद्राचार्य महाराज म्हणाले कि , श्रीगंगोत्री उत्तर भारतीय भवनच्या गृहप्रवेश वेळी देखील मीच येणार आहे . गीता जैन यांना एनडीए तिकीट मिळण्यासाठी ज्यांना सांगायचे त्यांना सांगेन . मात्र तिकीट नाही दिली तर त्या पुन्हा अपक्ष म्हणून निवडनू येतील आणि एनडीए ला पाठिंबा देतील असं वक्तव्य त्यांनी केले .

आपण आता पर्यंत २५० ग्रंथ लिहले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत ते शतायुषी होवोत . जन्मदिनाच्या त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद आहेत . ते देशाचे चौथ्यांदा पण प्रधानमंत्री बनणार असा आशीर्वाद आहे . यंदा महाराष्ट्रात विधानसभा निवडुनिकीचा निकाल एनडीए च्या बाजूने
लागणार आहे . परंतु त्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागेल.

उत्तर भारतीय भवन हे खाजगी जागेत आणि सरकार वा पालिकेचा पैसा न घेता बनवले जात असून महापालिकेने त्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी आणण्या करता प्राथमिक मंजुरी दिली आहे . ती मंजुरी येताच पालिके कडून बांधकाम परवानगी घेऊन उत्तर भारतीय भवनची इमारत बांधून ती समाजास लोकार्पण केली जाणार असल्याचे आ . गीता जैन म्हणाल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow