​​​​​​​बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडीची 5 वाहनांना धडक:अपघातावेळी संकेत बावनकुळे गाडीतच, पोलिसांची स्पष्टोक्ती; चालकावर गुन्हा अन् सुटका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या आलिशान भरधाव कारने 5 वाहनांना धडक दिल्याची घटना ऑरेंज सिटी नागपुरात घडली आहे. ज्या कारने हा अपघात झाला ती कार आपला मुलगा संकेत याच्या नावाने असल्याची कबुली बावनकुळे यांनी दिली. पण सोबतच संकेत हाच कार चालवत होता हे वृत्त त्यांनी फेटाळले. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अपघातावेळी संकेत बावनकुळे गाडीतच होते असा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. संकेत बावनकुळे कारमध्येच होता पोलिसांनी सोमवारी सांगितले की, अपघातग्रस्त कारमध्ये अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे व रोनित चिंतमवार हे 3 जण होते. या तिघांनाही सोमवारी रात्री उशिरा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांची चौकशी जाली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालक अर्जुन हावरेला अटक केली होती. पण गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे रात्रीच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. पत्रकारांनी यावेळी पोलिस अधिकाऱ्याला संकेत बावनकुळे कुठे बसला होता? असा थेट प्रश्न केला असता त्यांनी ते चालकाच्या बाजूला बसल्याचे सांगितले. संकेत बावनकुळे चालकाच्या शेजारच्या समोरील सीटवर बसला होता. तर रोनित चिंतमवार मागच्या सीटवर बसला होता. या तिघांनी हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर तेथून घरी परत जाताना हा अपघात झाला. डॉक्टरांनी 2 जणांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, त्यांच्या रक्ताचे नमुणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. या प्रकरणी केवळ ड्रायव्हरवर गुन्हा दाखल आहे. संकेत किंवा रोनितवर गुन्हा दाखल नाही. या प्रकरणी तपास सुरू आहे. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची टीका? दुसरीकडे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अपघातावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होते असा थेट आरोप केला आहे. नागपूरच्या रामदास पेठ येथे घडलेले हिट अँड रनच्या प्रकरणातील गाडीचा नंबर पोलिसांनी का नोंदवला नाही? माझा थेट आरोप आहे की, अपघातावेळी या गाडीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे उपस्थित होता. अपघातावेळी पोलिसांनी गाडी नंबर नोंद करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे या प्रकरणात वेगळा न्याय का दिला? गाडी व संबंधित लोकांना पोलिसांनी ताब्यात का घेतले नाही? एका नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय आणि सर्व सामान्यांना वेगळा न्याय का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता. बारचे सीसीटीव्ही हस्तगत करा नागपूर हिट अँड रन केसमधील फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांची सुरक्षितता अतिमहत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची बाब संकेत बावनकुळे आणि त्याचे 3 साथीदार ज्या लाहोरी बारमध्ये मद्यपान करत होते त्या बार आणि आसपासचे CCTV फुटेज तात्काळ हस्तगत करायला हवे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. चुकीच्या कृत्यावर कारवाई झाली पाहिजे - बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही वक्तव्य या घटनेवर आले आहे. तो म्हणाला, 'ती गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे. पोलिसांनी अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी. न्याय हा कोणासाठी वेगळा नाही. दोषींवर कारवाई करावी. कोणाचाही राजकीय संबंध असो, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. संपूर्ण गृहखात्याकडून भाजप नेत्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न -काँग्रेस उल्लेखनीय बाब म्हणजे गत 2-3 दिवसांत आंतरवाली सराटीत मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा आंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांच्यात नेमकी कोणती सल्लामसलत झाली हे समजले नाही. पण आता जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा करून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीच्या अडचणींत वाढ केली. दुसरीकडे, काँग्रेसने संपूर्ण सरकार भाजप नेत्याच्या मुलाला वाचवत असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या मुलाला वाचवायला आणि लपवायला सुरुवात केली. कायदा आणि सुव्यवस्था ही केवळ सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी आहे का? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

Sep 10, 2024 - 22:13
 0  9

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow