अपघात झाला त्यावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होते:पोलिसांनी दिली माहिती, कारचालकासह मित्राला मिळाला जामीन

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारने रविवारी मध्यरात्री पाच दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना प्राथमिक वैद्यकीय उपचार देऊन लागलीच घरी सोडण्यात आले. अपघात झाला त्यावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होते अशी माहिती नागपूर झोन दोनचे डीसीपी राहुल मदने यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी मध्यरात्री रामदासपेठेतील सेंट्रल बाजार रोडवरील हाॅटेल सेंटर पाॅईटसमोर एमएच 40, सीवाय 4040 या इलेक्ट्रिक ऑडी कारने दुचाकीसह चार चाकी वाहनांना धडक दिली. यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झालेले आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. आधी कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचे दिसून आले. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचे पोलिसांना आढळून आल्याचे मदने यांनी सांगितले. अपघात झाला तेव्हा संकेत बावनकुळे कारमध्ये होते की नाही, याबाबत सुरुवातीला स्पष्टता नव्हती. पोलिसांनीही प्रारंभी यावर बोलणे टाळले. मात्र, ते तेव्हा कारमध्येच होते, अशी माहिती डीसीपी मदने यांनी दिली. “चालक अर्जुन जितेंद्र हावरे, संकेत बावनकुळे, रोनित चित्तमवार हे तिघे गाडीत होते. त्यानुसार आपण तिघांनाही चौकशीसाठी बोलवले होते. चौकशी झाली आहे. चालकाला अटक केली होती. रात्री उशीरा त्याला जामीन देण्यात आला आहे”, असे मदने यांनी सांगितले. दरम्यान, अपघातावेळी संकेत बावनकुळे कुठे बसले होते, याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. कार अर्जुन हावरे चालवत होता तर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आणि रोहित चिंतमवार (२७) मागच्या सीटवर बसला होता. याशिवाय, अपघात झाल्यानंतर पुढच्या चौकात या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांना अडवले व काहींनी मारहाणही केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मात्र, संकेत बावनकुळेंना मारहाण झाली किंवा नाही, याबाबत पोलिसांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. हाॅटेलमधून घरी जाताना अपघात दरम्यान, रात्री एका हाॅटेलमधून जेवण करून घरी जात असताना हा अपघात घडल्याचे सीसीटीव्ही फूटेजच्या तपासात दिसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. “यावेळी चालक नशेत होता असे आढळून आले आहे. डॉक्टरांनी तसे रिपोर्ट दिले आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट यायचा आहे. रात्री दोघांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यात ते नशेत होते असा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. चालकावर गुन्हा दाखल आहे. रोहित वा संकेतवर गुन्हा दाखल नाही. त्याबाबत तपास सुरू आहे”, अशी माहिती मदने यांनी दिली.

Sep 10, 2024 - 22:13
 0  8

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow