नांदेड येथे रविवारी चक्रधरस्वामी राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार वितरण:अर्चना देव, डॉ. वासुदेव मुलाटे, हबीब भंडारे यांचा गौरव

शेवाळा येथील श्रीचक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय वाङमय पुरस्काराचे रविवारी ता. १५ दुपारी बारा वाजता नांदेड येथे होणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष तथा साहित्यीक अनिल कपाटे यांनी दिली आहे. श्री चक्रधर स्वामी वाचनालयाच्या वतीने साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारासाठी समितीच्या वतीने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता नांदेड येथे या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. नांदेड येथील विसावा पॅलेस हॉटेलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक बालाजी इबितदार उपस्थित राहणार असून जेष्ठ साहित्यीक देविदास फुलारी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी हिंगोली जिल्हा ग्रंथालय निरीक्षक मिलींद सोनकांबळे, प्रा. स्वाती कान्हेगावकर, प्रा. डॉ. संजय जगताप, मुख्याध्यापक देवानंद मुंडे यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी अर्चना देव (बुलढाणा), डॉ. राजेंद्र राऊत, सागर शिंगणे (अमरावती), डॉ. प्रतिमा जाधव (लासलगाव), हरिचंद्र पाटील (टेंभूर्णी), शंकर विभुते (नांदेड), भास्कर बंगाळे (पंढरपूर), डॉ. पराग नलावडे (भाईंदर, मुंबई), राकेश साळुंके (सातारा), इंद्रजीत पाटील (बार्शी), सचिन पाटील (कर्नाळ), डॉ. वासुदेव मुलाटे, हबीब भंडारे (छत्रपती संभाजीनगर), शिवाजी शिंदे (सोलापूर), राजन लाखे (पुणे), प्रा. डॉ. यशवंत पाटील (नाशीक), भुपाळी निसळ (अहमदनगर), वर्षा किडे कुलकर्णी (नागपूर), प्रा. डॉ. किसन माने (सांगाेला), प्रा. डॉ. सुमती पवार (धुळे), सचिन कुसनाळे (कोल्हापूर) यांना पुरस्कार दिले जाणार आहे. यावेळी उपस्थि राहण्याचे आवाहन अनिल कपाटे यांच्यासह वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Sep 10, 2024 - 22:13
 0  5

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow