मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने धावणार

Sep 23, 2024 - 14:18
Sep 23, 2024 - 14:24
 0  17
मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने धावणार

मुबई - देशातील पहिली बुलेट ट्रेन गुजरातमधील वडोदरा येथून मुंबईच्या दिशेने धावणार आहे. गुरुवारी बुलेट ट्रेनचे प्रकल्प संचालक प्रमोद शर्मा यांनी वडोदरा येथील बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी केली.

प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर प्रमोद शर्मा म्हणाले, बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण लांबी 508 किलोमीटर असून प्रकल्पाची एकूण किंमत 1.08 लाख कोटी रुपये आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण काम जपानी तंत्रज्ञानाच्या साह्याने केले जात आहे. आतापर्यंत या प्रकल्पातील 212 किमी मार्गाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पायाभरणीच्या 345 किमीपैकी 333 किमी, तर 145 किमीपैकी 212 किमीचे काम पूर्ण झाले आहे. गर्डर टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने धावणार आहे. या ट्रेनचा कमाल वेग ताशी 350 किमी असेल. सुरत आणि बेलीमोरा दरम्यान 2026 मध्ये ट्रायल रनचे लक्ष्य आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी सर्व सिव्हिल आणि ट्रॅक मशिनरी भारतात बनवली जात आहे. आतापर्यंत वडोदरा शहरातील बुलेट ट्रेनच्या 87.5 किमी लांबीच्या रुळावर दोन्ही बाजूंना नॉईज बॅरिअर्स लावण्यात आले आहेत, त्यापैकी 50 टक्के काम पूर्ण झाले आहे.

अहमदाबाद ते मुंबई दरम्यान 12 बुलेट ट्रेन स्टेशन्स बांधली जाणार आहेत. यामध्ये गुजरातमधील वापी, बेलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे स्थानके बांधली जातील, तर महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार येथे सर्व स्थानके लोकल थीमवर आधारित असतील. सर्व रेल्वे स्थानकांच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून डिसेंबर 2025 पर्यंत ही सर्व बुलेट ट्रेन स्टेशन तयार होतील अशी अपेक्षा आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जेवढ्या वेगाने सुरू आहे त्याच वेगाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow