महायुतीमध्ये काही मागावे अशी अजितदादांची पोजिशन नाही:सध्या ते केवळ अरोरा सांगतात तसे वागतात, जयंत पाटील यांचा टोला

मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार काही मागणी करतील असे मला वाटत नाही, त्यांची महायुतीमध्ये तशी पोजिशन नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तर महायुतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. अनेकांना तिथे मुख्यमंत्री व्हायचंय असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान जयंत पाटील म्हणाले की, सध्याचे अजित पवार हे अरोरा नावाचे कन्सल्टंट सांगतील तसं बोलतात. शरद पवारांना सोडून चूक झाल्याचे अजितदादांनी स्वतःहून सांगितले आहे. अजित पवार पहिल्यासारखे बोलत नाहीत, असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे. ..तर आमचा विजय निश्चित जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार हे आता सल्लागार सांगतात तसे बोलतात. सहानुभूती, मागच्या झालेल्या गोष्टी दुरुस्त करण्याची इच्छा दाखवण्याचा प्रयत्न करणे, हे अरोराने दादांमध्ये केलेले परिवर्तन आहे. भाजपसोडून आमच्याकडे लोक येत आहे, त्यांनी भाजप सोडू नयेत म्हणून हे मैत्रीपूर्ण लढत असे पुढे आणले आहे. असे काही होणार नाही आणि झालेच तर तिथे आमचा विजय निश्चित आहे हे आम्हाला आजच म्हणाता येईल. अजित पवारांना वेगळे लढावे लागेल जयंत पाटील म्हणाले की, महायुती अडचणीत असल्याने अजित पवार यांनी तात्पुरते वेगळे व्हावे, वेगळे लढावे, असे कदाचित त्यांना सांगितले जाऊ शकते. अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही, तर सबंध देशात कमी झाली आहे. पक्ष कसा चालला पाहिजे. याचा सर्वात जास्त अनुभव मला आहे. माझे दिवस मोजणाऱ्यांना ते कळून चुकले असेल, असे सांगत फडणवीस यांच्या मनात काय आहे, हे अमित शहा यांना कळत नाही आणि फडणवीस यांना कळत नाही की अमित शहा यांच्या मनात काय आहे. त्यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण झाले आहे

Sep 10, 2024 - 22:13
Sep 23, 2024 - 15:35
 0  5

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow