महामोदकाचा महाविक्रम:छत्रपती संभाजीनगरात 'दिव्य मराठी' करतोय नवा रेकॉर्ड, बनतोय 1400 किलोंचा मोदक
गणेशोत्सवानिमित्त दैनिक दिव्य मराठीने छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. आज महामोदकाच्या महाविक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. शहराचा एक नवा रेकॉर्ड यानिमित्ताने होणार आहे. सर्वात मोठा 1400 किलोंचा मोदक यानिमित्ताने बनवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आनंद स्वीटस हा मोदक बनवत आहे. दैनिक दिव्य मराठी आणि कल्याण सेलिब्रेशन्सद्वारे हा महाविक्रम होत आहे. हा मोदक बनण्यास 2 दिवसांचा कालावधी लागणार असून त्यानंतर 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान कल्याण सेलिब्रेशन्स, पैठण रोड याठिकाणी हा मोदक ठेवण्यात येणार आहे. विद्येची देवता मानल्या गेलेल्या गणपतीची आराधना करण्यासाठी श्री संस्थान गणपती आणि दैनिक दिव्य मराठीच्या वतीने महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. राजाबाजार येथील ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीसमोर हा भव्य कार्यक्रम 9 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी महिलांचा उदंड असा प्रतिसाद पाहायला मिळाला. पहिल्यांदाच शहरात अथर्वशीर्ष पठणचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी उदंड प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. ग्रामदैवत संस्थान गणपती समोर सकाळी 8ः30 वाजता लाल वस्त्र परिधान केलेल्या महिला जमल्या. 11 ब्राह्मणांच्या उपस्थितीत महिलांनी अर्थवशीर्षचा पाठ केला. विजयकुमार पल्लोड गुरुजींनी या वेळी स्तोत्राचा अर्थही उलगडून सांगितला. सव्वा लाख रुपयांच्या बक्षिसांचे आकर्षण 13 सप्टेंबर रोजी महाकाल प्रतिष्ठानच्या संयुक्त संचलनाने ढोलवादन ही खास स्पर्धा आयोजित केली आहे. ढोल पथकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन या बक्षिसांचे प्रायोजक शिवसेना उद्धव गटाचे पश्चिम मतदार संघाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे. चित्राद्वारे मुलांना जिंकता येतील 70 हजारांची बक्षिसे 14 सप्टेंबर रोजी माझ्या मनातील बाप्पा या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होत आहे. यात मुलांना 70 हजार रुपयांचे रोख बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. सर्वाधिक मुले सहभागी करणाऱ्या शाळांसाठीही विशेष चषक आहे. मुलांना ड्रॉइंग शीट जागेवरच मिळेल, रंगाचे साहित्य सोबत आणावे.

What's Your Reaction?






